Pune Porsche Car Accident : अल्पवयीन मुलाला जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष ABP Majha

Continues below advertisement

पुणे: कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन धनिकपुत्राने आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना सध्या चांगलीच गाजत आहे. दररोज याप्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोप असलेला मुलगा हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांच्या सरकारी यंत्रणेशी असलेल्या लागेबांध्यांमुळे त्यांच्या मुलावर कठोर कारवाई होऊ शकली नाही, असा आरोप आहे. अशातच आता अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendrakumar Agrawal) यांचेही अंडरवर्ल्डशी लागेबांधे असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शिंदे गटाचे पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांनी अनेक गंभीर आरोप केले आहे. सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी पूर्वी झालेल्या एका वादात अजय भोसले यांना ठार मारण्यासाठी छोटा राजनला सुपारी दिल्याचा आरोप आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या पार्श्वभूमीवर अजय भोसले यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना अग्रवाल कुटुंबावर आगपाखड केली.

सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी मला ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती. त्यासाठी सुरेंद्रकुमार अग्रवाल बँकॉकला जाऊन छोटा राजनला भेटले होते. या सगळ्याचे पुरावे असूनही सुरेशकुमार अग्रवाल यांना अद्याप अटक होऊ शकलेली नाही. त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे, त्यांचा आर्थिक व्यवहार जोरात असल्याने ते जातील तिकडे कायदा विकत घेतात. संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल आहे. कुटुंबातील सर्व लोकांवर दोन-दोन गुन्हे दाखल आहेत. आतादेखील अपघात प्रकरणानंतर आपण पैशांच्या जोरावर आपण सगळं काही विकत घेऊ, असे त्यांना वाटते. ती मोठी लोकं आहेत, त्यांना कायदा-सुव्यवस्थेची भीती नाही, असे अजय भोसले यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram