Fake Document | बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणाऱ्या टोळीचा पुणे पोलीसांकडून पर्दाफाश
बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शिवाजीनगरसह वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून सात गुन्हे दाखल करत 37 जणांना अटक करण्यात आली आहे.यामध्ये 31 पुरूष व सात महिलांचा समावेश आहे. या टोळीने साधारण आतापर्यंत 25 हजारांपेक्षा जास्त आरोपींना जामीन मिळवून दिला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे.