Pune Cosie and Black Pub : ज्या पबमध्ये वेदांतला एन्ट्री दिली, त्या पबवर धाड, काय काय सापडलं?

Continues below advertisement

पुणे : पुण्यातील कोझी अॅड ब्लॅक या बारवर उप्लादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. हे बार सील करण्यात आलं आहे. पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या पोर्शे कारतच्या धडकेत दोघांचा निष्पाप जीव गेला. या अपघाताला कारणीभूत असलेला विशाल अग्रवालच्या मुलाने याच बारमध्ये पार्टी केली होती. तो अल्पवयीन होता तरीदेखील या बारमध्ये त्याला प्रवेश दिला होता. अल्पवयीन असलेल्या मुलाला प्रवेश दिल्यामुळे आणि त्याचा दारु सर्व्ह केल्याने या बारवर कारवाई करण्यात येत आहे. 

या पबमधील दारु, फ्रिज आणि बिल्सेरी बॉटल्ससहित इतर सामान सील करण्यात येत आहेत. Porsche Car अपघातात गुंतलेल्या अल्पवयीन मुलांना दारू पुरवल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने नोंदवलेल्या नियम उल्लंघनाच्या प्रकरणातहॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) आणि  पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल पबवर कारवाई करण्यात आली आहे. 

परवानाधारक अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करू नये.परवानाधारकाने पहाटे 1.30 नंतर (दिलेली वेळ) कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करू नये. परवानाधारक महिला वेटर्समार्फत उत्पादन शुल्क विभागाच्या नोकरनामा शिवाय आणि रात्री 9.30 नंतर कोणतीही विदेशी दारू सर्व्ह करू शकणार नाही.आणि जर बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट-1949 आणि बॉम्बे फॉरेन लिकर रुल्स-1953 अंतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी आणि नियमांचे उल्लंघन केले असेल तर त्या आस्थापनांवर नियमानुसार गुन्हे नोंद केले जातील  मद्य विक्री लायसन्स निलंबित अथवा रद्द केले जातील, असं उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 

अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांना अटक देखील आली आहे. त्यासोबतच विशाल अग्रवालसह ड्रायव्हर आणि अन्य एक व्यक्तीलाही अटक करण्यात आलीये. अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचं नाव चत्रभूज डोळस आहे तर दुसरा व्यक्ती राकेश पौडवाललाही अटक करण्यात आली आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram