Pimpri : महापारेषणच्या 400 केव्ही टॉवरमध्ये बिघाड, पिंपरी चिंचवड भागात वीज आणि पाणी पुरवठा खंडित

पिंपरी चिंचवडकरांनो आज पाणी जरा जपून वापरा कारण तुमच्या भागातला पाणीपुरवठा आज दिवसभर विस्कळीत राहणार आहे. विद्युत वितरण कंपनीच्या 400 किलोवॅट अतीउच्च दाब वाहिनीत तांत्रिक बिघाड झालाय त्यामुळे रावेत आणि सेक्टर-23  या भागात वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. मात्र याच भागात जलउपसा आणि जलशुद्धीकरण केंद्र आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका या जलशुद्धीकरण केंद्रालाही बसलाय. त्यामुळे आज दिवसभर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola