Karnataka Hijab row : 'हिजाब'वरुन वातावरण तापलं, महाराष्ट्रातही पडसाद ABP Majha

कर्नाटकात सुरु असलेल्या याच वादाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले..मुंबईतल्या मदनपुरा भागात मुस्लिम महिलांनी हिजाबच्या समर्थनार्थ सह्यांची मोहिम चालवीय..याच भागात मुस्लिम महिलांनी रॅलीही काढली. तिकडे बीड आणि मालेगावातही कर्नाटकातल्या घटनेचे पडसाद उमटले आहेत.. हिजाबच्या समर्थनार्थ बीडमधल्या चौकांमध्ये पोस्टर लागले आहेत. पहले हिजाब, फिर किताब असा आशय या पोस्टरवर आहे. तिकडे नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्येही राष्ट्रवादी विद्यार्थी सेलनं मोर्चा काढलाय..महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढत कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला..पूर्वीप्रमाणेच बुरखा घालून विद्यार्थिनींना शाळेत प्रवेश द्यावा अशी मागणी करण्यात आली..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola