Pune : फी सवलतीवरुन विद्यार्थी-शिक्षकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, विद्यार्थ्यानं डोकं आपटलं
पिंपरी-चिंचवड मधल्या एका शाळेत फी-सवलतीवरुन एक धक्कादायक प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यानं आपलं डोकं काचेवर आपटून घेत स्वतःला जखमी केलं आहे. महात्मा फुले महाविद्यालयातील ही धक्कादायक घटना आहे. शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी आणि त्याला समर्थन देणाऱ्या संघटनांनी केला आहे.