Pune Passport Office : पुण्यातील पासपोर्ट सेवा पुन्हा सुरु, सकाळपासून खोळंबलेल्यांना दिलासा
देशात आणि राज्याच्या विविध भागातील पासपोर्ट कार्यालयातील सर्व्हर डाऊन झाल्यानं नागरिकांचं हाल झाले. तांत्रिक बिघाडामुळे पासपोर्ट कार्यालयातील काम ठप्प झालं. पुणे, अमरावती आणि परभणीतील पासपोर्ट कार्यालयात आलेल्या नागरिकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला. आता पुणे पासपोर्ट कार्यालयातील सर्व्हर पुन्हा सुरू झालंय.