Gondia Chumbli Village Crisis : ना नदीवर पूल, ना धड रस्ता; जीव मुठीत धरून नदीतून प्रवास ABP Majha
देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु असताना गोंदियातील एका गावात ना नदीवर पूल आहे, ना रस्ता आहे. त्यामुळे चुंबली गावातील नागरिकांना तालुका मुख्यालयाला जाताना बोटीतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. देवरीचे आमदार सहसराम कोरोटे यांनी निवडून आल्यानंतर या गावाला एक बोट दिली होती. पण तीही आता मोडकळीस आलीय.