Paper Leak Pune : परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी तुकाराम सुपे यांच्या घरावर धाड, 2 कोटींचं घबाड जप्त

Continues below advertisement

ज्यांच्या हाती राज्याच्या प्रशासनाचं भवितव्य, त्यांनीच भ्रष्टाचार केल्याचं धक्कादायक वास्तव राज्यात घडलं आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपेंच्या घरावर दुसऱ्यांदा धाड टाकली. त्यात पोलिसांनी जवळपास 2 कोटींचं घबाड जप्त केलं आहे. सुपेंच्या घरातून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती मिळते आहे. याआधी झालेल्या धाडीत पोलिसांनी 90 लाखांचं घबाड हस्तगत केलं होतं. पण पुन्हा पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीनं 
सुपेंच्या पत्नी आणि मेहुण्यानं रक्कम आणि दागिने दुसरीकडे लपवले. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोख रकमेसह ऐवज पोलिसांच्या हाती लागला आहे. तुकाराम सुपे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत. लष्कर भरती, आरोग्य भरती, म्हाडा भरती आणि शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराचं रॅकेट आता हळूहळू उघड झालं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram