Pune : वडगाव शेरी परिसरातील दहावीत शिकणाऱ्या एका मुलीवर एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला

Continues below advertisement

Pune : पुण्यातील वडगाव शेरी परिसरात दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर वडगाव शेरी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. शाळेच्या आवारातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. येरवडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वडगाव शेरी येथील एका शाळेच्या आवारात आज सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. पीडित मुलगी शाळेत असताना आरोपीने शाळेत जाऊन हत्याराने तिच्यावर वार केले. या हल्ल्यात विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वडगाव शेरी येथील सिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.येरवडा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram