HSC Exam Paper Leak : अहमदनगरच्या श्रीगोंद्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला
HSC Exam Paper Leak : अहमदनगरच्या (Ahmednagar) श्रीगोंद्यात (Shrigonda) बारावीचा गणिताचा (12th Maths Paper) पेपर फुटला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी जवळपास पाऊण तास आधीच पेपर फुटला होता. एवढंच नाहीतर उत्तरासहित प्रश्नपत्रिका आधीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर म्हणजेच, व्हॉट्सअॅपवर आल्या होत्या. या प्रकारामुळं एकच खळबळ उडाली आहे.