Pune Highway Toll : जुन्या पुणे मुंबई मार्गावरील सोमाटणे टोल नाका बंद करण्यासाठी मावळवासीय रस्त्यावर

Continues below advertisement

जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाका बंद करण्यासाठी मावळवासीय रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी भेट दिली.  राष्ट्रीय महामार्गावर 60 किमीच्या अंतरात एकच टोल असावा असा नियम आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यात सोमाटणे आणि वरसोली या दोन टोलनाक्यांमधील अंतर 31 मीटरचं आहे. शिवाय 2019 साली मुदत संपल्यानंतर ही इथं टोल आकारणी होत असल्याचा दावा टोल हटाव कृती समितीनं केला आहे. म्हणूनच बेकायदेशीरपणे सुरू असलेली लूट थांबवून हा टोल नाका बंद करावा या मागणीसाठी शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरु होतं. आज मावळवासीय रस्त्यावर उतरले आणि त्याची दखल राज्य सरकारनं घेतली. मंत्री रवींद्र चव्हाण आंदोलनाच्या ठिकाणी पोहचले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram