Pune : पुण्यात मावळमधील कार्यक्रमात NCP कार्यकर्त्यांची तुफान गर्दी ABP Majha
एकीकडे पुण्यात कोरोना मृत्यूचे आकडे घटले असले तरी कोरोनाचं संकट मात्र टळलेलं नाही.. त्यात आज मावळमध्ये राजकीय सभेत तुफान गर्दी पाहायला मिळतेय...
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे जाहीर सभा घेतायेत.. मावळ विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अक्षरशः कोरोना नियमांना तिलांजली दिली जातीये. सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडालेला आहेच पण एकाच्या ही तोंडाला मास्क नाही. दुपारच्या लोणावळ्यातील कार्यक्रमात झालेल्या गर्दी आणि नियमांना घातलेल्या तिलांजलीवरून अजित पवारांनी उघड नाराजी व्यक्त केली.