मध्य रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंड, 6 महिन्यात 71 कोटींचा दंड वसूल
राज्य सरकारच्या निर्देशानुसार विनातिकीट आणि कोरोना नियमांचे पालन न करता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वे कडून प्रचंड दंड आकारला जात आहे. यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये एकूण 12.47 लाख प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात आले आहेत. त्यांच्याकडून दंड म्हणून 71.25 कोटींची रक्कम वसूल करण्यात आली आहे. वसूली केलेल्या दंडाची रक्कम भारतीय रेल्वेच्या इतर सर्व विभागांत सर्वाधिक असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.