G20 Pune : जी 20 परिषदेसाठी पुणे महानगरपालिका सज्ज, पुण्याचं रुपड बदलणार
पुण्यात होत असलेल्या जी 20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरातील तयारीचा आढावा घेतला. नागरिकांच्या सहभागातून सार्वजनिक स्वच्छता करण्याच्या हेतूने पुणे महापालिकेतर्फे शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलं आहे.