Pune Ward Delimitation: पुणे प्रभाग रचना जाहीर, २३ गावे, १६५ नगरसेवक; विरोधकांचे आक्षेप
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर होणार आहे. चार सदस्यीय समितीने प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला होता. हा आराखडा महापालिकेने आधी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवला होता. त्यानंतर तो राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला. निवडणूक आयोगाने अंतिम मंजुरी दिल्यानंतर पुणे महापालिकेकडून आज संकेतस्थळावरती प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेत तेवीस गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन प्रभाग रचनेनुसार पुण्यात नगरसेवकांची संख्या शंभर पासष्ठ असणार आहे. प्रभाग रचनेचा हा आराखडा प्रसिद्ध झाल्यावर त्यावर काय प्रतिक्रिया उमटतील याकडे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षांकडून सातत्याने आक्षेप घेतला जात आहे की ही प्रभाग रचना भारतीय जनता पक्षाला अनुकूल आहे. त्यामुळे आज आराखडा जाहीर झाल्यावर विरोधकांकडून याबद्दल नक्कीच प्रतिक्रिया उमटतील अशी अपेक्षा आहे.