Ladki Bahin Yojana Scam | लाडकी बहीण योजनेत पुरुष लाभार्थी? शासनाचे कारवाईचे आदेश

Continues below advertisement
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक आनंदाची बातमी आहे. या महिन्याचे वेतन २४ ऑगस्ट रोजी मिळणार आहे. गणेशोत्सवानिमित्त पाच दिवस आधी पगार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दुसरीकडे, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत अनियमितता समोर आली आहे. राज्यभरातील १,१८३ जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने सरकारला दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या १७ पुरुष कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. या बोगस लाभार्थींवर कारवाई करण्याचे आदेश सरकारच्या कक्ष अधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) दिले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल. "परंतु ज्यांनी जाणूनबुजून जर हा लाभ घेतलेला असेल तर ती चुकीची आहे आणि त्यांच्यावरती मग ती निसर्ग कारवाई होईल तो भाग वेगळा आहे," असे स्पष्ट करण्यात आले आहे. लाडक्या बहिणींना दर महिन्याला मिळणारे पंधराशे रुपये कुठेही खंडित होणार नाहीत, असेही नमूद करण्यात आले आहे. चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्यांना वगळून खऱ्या गरजू आणि लाभापासून वंचित असलेल्यांना योजनेत समाविष्ट केले जाईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola