पुणे मिनी लॉकडाऊन : दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली, रेस्टॉरंट 4 वाजेपर्यंत 50% क्षमतेने सुरू
पुण्यात आधीच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे. आजपासून (28 जून) पुणेकरांना नवीन नियमांचं पालन करावं लागणार आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार-रविवार पूर्णपणे बंद राहतील. पुण्यात सध्या दुकाने सात वाजेपर्यंत तर रेस्टॉरंट, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी होती.
Tags :
Maharashtra Unlock Ajit Pawar Deputy Chief Minister Ajit Pawar Speech Maharashtra Lockdown Pune Unlock Pune Lockdown Lockdown In Pune Pune Weekend Lockdown Pune Lockdown Rules