Pune Garbage Issue | पुण्यातील कचराकोंडी अद्यापही कायम, कचरा न उचलण्याचा दहावा दिवस
एकीकडे जगभरात कोरोनानं हजारोनं बळी घेतले असतानाही पुणे महापालिका प्रशासन मात्र अजूनही ढिम्म असल्याचं पाहायला मिळतंय. पुणे शहरात कचरा न उचलण्याचा आज दहावा दिवस आहे. त्यामुळे पुणे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढिग पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी आणि उरुळी कचरा डेपोला स्थानिकांचा विरोध आहे. कचरा डेपोमुळे होणारं प्रदूषण, दुर्गंधी, साथीचे रोग आणि डासांची पैदास यामुळे स्थानिक हैराण आहेत. त्यामुळे पुणे शहराचा कचरा फुरसुंगी, उरुळी डेपोत कचरा टाकण्यास स्थानिक विरोध करताहेत. कोरोनासारखा धोका असतानाही पुणे महापालिकेला जाग कधी येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.