PUNE MHADA LOTTERY : दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाची 3,000 हून अधिक घरांसाठी लॉटरी
मिकी घई, एबीपी माझा
Updated at:
19 Oct 2021 09:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Mhada Lottery : पुणे आणि परिसरात घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी आता सुवर्णसंधी आहे. मुंबई आणि परिसरानंतर बहुतांश लोकांचा कल हा पुण्यात घर घेण्याचा असतो. दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाच्या (Mhada) वतीनं तब्बल 3 हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या घरांमध्ये जवळपास दीड हजार घरं 20 टक्क्यातील आणि नामांकित, मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली आहे.