Pune : पुणे - कोथरूड परिसरातील मेट्रो कारशेड भागात गोळीबार, मेट्रो कर्मचारी जखमी ABP Majha
Pune : पुण्यातील कोथरूड डेपो परिसरात असलेल्या मेट्रो कारशेड भागात फायरिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. एका कर्मचाऱ्याला गोळी लागल्याने किरकोळ जखमी झाले. तर या ठिकाणी काही काडतुसे देखील सापडली आहेत.
कोथरुड परिसरात असलेल्या मेट्रोच्या या कारशेडमध्ये काम सुरू आहे. अनेक कामगार त्याठिकाणी काम करत असतात. काल काम सुरू असताना सायंकाळच्या सुमारास अचानक बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आला. तर एक गोळी येथील कर्मचाऱ्याच्या पायाला देखील चाटून गेली. यामध्ये हा कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.
या ठिकाणी फायरिंग कुणी केली, बंदुकीच्या गोळ्या नेमक्या कुठून आल्या याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.
Tags :
Pune News Latest Marathi News Abp Majha Pune Police Pune Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Pune Metro Pune Crime ABP Majha ABP Majha Video