Pune Kothrud परिसरात गोळीबार, फायरिंगदरम्यान Metro कर्मचारी जखमी, गोळीबार कुणी केला?

Pune : पुण्यातील कोथरूड डेपो परिसरात असलेल्या मेट्रो कारशेड भागात फायरिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. एका कर्मचाऱ्याला गोळी लागल्याने किरकोळ जखमी झाले. तर या ठिकाणी काही काडतुसे देखील सापडली आहेत.

कोथरुड परिसरात असलेल्या मेट्रोच्या या कारशेडमध्ये काम सुरू आहे. अनेक कामगार त्याठिकाणी काम करत असतात. काल काम सुरू असताना सायंकाळच्या सुमारास अचानक बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आला. तर एक गोळी येथील कर्मचाऱ्याच्या पायाला देखील चाटून गेली. यामध्ये हा कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.

या ठिकाणी फायरिंग कुणी केली, बंदुकीच्या गोळ्या नेमक्या कुठून आल्या याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola