Pune Metro : पुणेकरांना करता येणार जलद प्रवास, सोमवारपासून पुणे मेट्रो सुरू
abp majha web team
Updated at:
05 Mar 2022 04:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. त्यातील एक मार्ग आहे वनाझ ते रामवाडी या दरम्यानचा. हा मार्ग 13 किलोमीटरचा असुन त्यापैकी वनाझ ते गरवारे हा पाच किलोमीटरचा मार्ग तयार झालाय त्याचे उद्या उद्घाटन होतय. तर दुसरा मार्ग आहे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट. हा मार्ग 12 किलोमीटरचा असुन त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सात किलोमीटरचे काम पुर्ण झालय. उद्या मोदी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या मार्गाचे उद्घाटन करणार आहेत