Pimpri-Swargate मार्गावरील Pune Metro ची ट्रायल रन, सायकलसह मेट्रो प्रवासाची मुभा
पुणे मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट या मार्गावरील फुगेवाडी ते संत तुकाराम महाराज स्टेशनदरम्यान आज ट्रायल रन घेण्यात आली. यावेळी अनेक सायकलस्वारांनी आपल्या सायकलसह मेट्रोतून प्रवास केला. विशेष म्हणजे सायकलसह प्रवास करण्यासाठी वेगळं तिकीट काढण्याचीही गरज नसेल.