PUNE : पुण्यामध्ये कोरोना लसीचा तुटवडा, व्हेंटिलेटरसाठी केंद्राकडे पाठपुरावा : महापौर मुरलीधर मोहोळ

Continues below advertisement

राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगलीसह अनेक ठिकाण कोरोना लसीचा एकही डोस शिल्लक नाही. त्यामुळे लसीकरण पूर्णपणे थांबलं आहे. तर कोल्हापुरातील लसीकरण आज दिवसभरात कधीही ठप्प होऊ शकतं. तर दुसरीकडे विदर्भातील अमरावती, वर्धा, बुलढाणा, गोंदियात सुद्धा लसीचा तुटवडा जाणवतोय. गोंदियातील लसीकरण सुद्धा बंद आहे. इतर जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला कोरोना लसीचा साठा उपलब्ध झाला नाही तर लसीकरण मोहीम अडचणीत येऊ शकते.  महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असून केंद्राने लवकरात लवकर लस पुरवावी अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. या दाव्यावरुन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram