45 वर्षांखालील कर्मचाऱ्यांना लस देणं गरजेचं, व्यवसाय धोक्यात, चितळे बंधूंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सर्वाना भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार लस घेणे बंधनकारक केले आहे. दुग्ध व्यवसायात देखील अत्यावश्यक सेवेत येतो. या व्यवसायात 45 वर्षापेक्षा कमी वयाचे अनेक कर्मचारी असल्याने त्यांच्यासाठी सुद्धा लसीकरण करण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी दूध डेअरी असोसिएशन कडून केली जातेय. याबाबत दूध डेअरी असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती पत्र लिहीत ही मागणी केली आहे.
Tags :
Corona Vaccination PM Modi Corona Vaccine Vaccination COVID Vaccine Uddhav Thackeray Sangli Chitale Bandhu Covid Vaccnation Dairy Milk Dairy