Pune Mayor Election | मुरलीधर मोहोळ भाजपचे महापौरपदाचे उमेदवार | पुणे | ABP Majha
पुणे महापौरपद निवडणुकीत भाजपने उमेदवाराचं नाव जाहीर केलंय. मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केलंय. मोहोळ आज भाजपकडून महापौरपदासाठी अर्ज दाखल करतील. 22 नोव्हेंबर रोजी महापौरपदाची निवडणूक होणार आहे. कोथरूड मतदारसंघातील भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी मुरलीधर मोहोळ इच्छुक होते. याआधी त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळलेला आहे.