Pune Market Yard शनिवार, रविवार राहणार बंद; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
मिकी घई, एबीपी माझा, पुणे
Updated at:
20 Apr 2021 12:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे : मार्केटयार्डमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता कोरोना संक्रमणाची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळेच पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील किराणा, भाजीपाला, फळविभाग शनिवार रविवार बंद ठेवून इतर दिवस 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतलाय, यानुसार पुण्यातील मार्केटयार्ड मध्ये फळे भाजीपाला व्यापार दिवसाआड सुरु राहणार आहे. मार्केटयार्ड मध्ये खरेदी आणि विक्रीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील गाळे दिवसाआड सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.