पुणेकरांना कोरोनाच्या संकटाचं गांभीर्य नाही? मार्केट यार्डमध्ये धडकी भरवणारं चित्र, नियम धाब्यावर
Pune Mini Lockdown: कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत पुण्यात आजपासून मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आजपासून पुढील सात दिवस हा मिनी लॉकडाऊन असणार आहे. सात दिवस सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, शाळा, कॉलेजेस, पीएमपीएमएलची बससेवा इत्यादी गोष्टी पूर्णपणे बंद असतील. कोरोना संकट कमी व्हावं या उद्देशाने हा मिनी लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे या लॉकडाऊनला लोकांचा प्रतिसाद देखील तितकच महत्वाचं आहे.