Sachin Vaze : मिठी नदीत सापडलेलं साहित्य एमआयएनं रचलेला बनाव, सचिन वाझेंचा युक्तिवाद

Continues below advertisement

मुंबई : मुंबईच्या मिठी नदीत सापडलेलं सारं साहित्य म्हणजे एनआयएने स्वतः निर्माण केलेला एक बनाव असल्याचा खळबळजनक आरोप शनिवारी सचिन वाझे यांच्यावतीनं विशेष एनआयए कोर्टात केला गेला. तसेच आपल्याला हृदयरोगाचा आजार असून रविवारी एक स्ट्रोक आल्याची माहितीही वाझेंनी स्वत:हून न्यायालयाला दिली. त्याची दखल घेत न्यायालयाने पुढील सुनावणीदरम्यान वाझेंचा वैद्यकीय चाचणी अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देत वाझे यांना 7 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली. शनिवारी सचिन वाझे यांची कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram