Pune Maratha Kranti Agitation | भरती प्रक्रियेत मराठा तरुणांची नियुक्ती होत नसल्याने पुण्यात आंदोलन

मराठा संघटनांच्या आंदोलनानंतर पुण्यातील महावितरण कार्यालयात सुरु असलेली कागदपत्रांची पडताळणी थांबवण्यात आली.  महावितरणमधे उपकेंद्र सहाय्यक या पदांकरती राज्यभरात  दोन हजार उमेदवार भरायचे होते. त्यासाठी जुलै 2019 मधे  ऊर्जा विभागाकडून जाहिरात काढण्यात आली.  त्यानंतर इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली आणि त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रं पडताळणीसाठी मागवण्यात आली.  पंरतु दरम्यानच्या काळात सप्टेंबर 2020 मधे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली.  त्यामुळे उर्जा विभागाने मराठा समाजातील उमेदवारांना वगळून इतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करायचं ठरवलं. मात्र मराठी संघटनांनी आज त्याला आक्षेप घेत आंदोलन पुकारले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola