Pune Firing | एकतर्फी प्रेमातून तरुणाचा गोळीबार, दोन तासांच्या पाठलागानंतर आरोपी पोलिसांच्या हाती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Mar 2020 12:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एकतर्फी प्रेमातून घडलेल्या जळीतकांडाने अख्खा महाराष्ट्र हादरला असताना या घटना थांबायच्या नाव घेताना दिसत नाहीत. आता तर एका तरुणाने तरुणीसमोरच चक्क गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करुन त्याला बेड्या ठोकल्या. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात ही धक्कादायक घटना रविवार (1 मार्च) सायंकाळी सहा वाजता घडली. घटनेच्या वेळी तरुणीचे नातेवाईकही सोबत होते. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात ही कैद झाली आहे. नारायणगाव पोलिसांनी पाठलाग करुन त्याला अटकही केली. सुदैवाने यात कोणालाही इजा झालेली नाही.