Lockdown | पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन; पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा
पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या भोवताली असलेल्या हवेली तालुक्यातील काही गावांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हा आदेश दिला. लवकरच याबाबतची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा लॉकडाऊन सोमवारपासून करायचा की मंगळवारपासून याचा निर्णय अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे.