Pune Koyta Gang : कोयत्या गॅंगची पुन्हा दहशत,डीबी ब्रांच आणि बिट मार्शलला पिस्तुल देणार :ABP Majha
कोयता गँगने पुणे पोलिसांना त्रस्त केलंय. रोज हल्ले, केक कापणं यात धिंड काढल्यानंतर आता पुणे पोलिसांनी डीबी ब्रांच आणि बिट मार्शलला पिस्तुल देण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी या सगळ्यांना खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचे दोन कॉन्स्टेबल आणि बीट मार्शल असे मिळून 75 पोलीस कॉन्स्टेबलना ही पिस्तुले आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असं असलं तरीही कोयता गॅंगला रोखणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. या सगळ्यांना प्रशिक्षण दिल्यावर शहरातील गुन्हेगारी कमी होईल का? कोयता गॅंगला आळा बसेल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.