Pune:राजीव गांधी प्राणी संग्रहालय इथे आगळा वेगळा उपक्रम,संग्रहालयाकडून वाघांसाठी स्प्रिंकलर आणि कुलर
Pune:राजीव गांधी प्राणी संग्रहालय इथे आगळा वेगळा उपक्रम,संग्रहालयाकडून वाघांसाठी स्प्रिंकलर आणि कुलर
पुण्यातील कात्रज परिसरातील राजीव गांधी प्राणी संग्रहालय इथे आगळा वेगळा उपक्रम करण्यात आला आहे. पुण्यात उन्हाळ्याचा कडाका वाढला आहे. माणसांप्रमाणे प्राण्यांना देखील उन्हाचा त्रास होत असतो. प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी संग्रहालयाकडून वाघांसाठी स्प्रिंकलर आणि कुलर लावण्यात आले आहेत. हत्तींसाठी तलाव तयार करण्यात आला आहे तर अस्वलांना आठवड्यातून 2-3 वेळा आइस केक दिला जातो. या उपक्रमामुळे नक्कीच प्राण्यांना उन्हापासून थोडा आराम मिळेल.