Pune bypoll Election : मत'संग्राम सुरू, Kasba आणि Chinchwad पोटनिवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होतंय.. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीये... कसबा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर, चिंचवडचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि चिंचवडच्या भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावलाय... कसबा पेठ मतदारसंघात दुहेरी लढत होतेय... भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत आहे...त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि मविआची प्रतिष्ठा पणाला लागलीये.. मतदारांनी पहाटेपासूनच मतदानासाठी रांगा लावल्यात... उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार असून मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.