Pune : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शिवसैनिकाचा हरताळ; जिल्हा परिषद सदस्याच्या मुलाच्या लग्नात गर्दी
पुण्यातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्यांनी मुलाच्या लग्नात कोरोना नियमांची अक्षरशः ऐशी तैशी केली आहे. दोनशे वऱ्हाडीची मुभा असताना तब्बल दोन हजार वऱ्हाडीच्या उपस्थित लग्न सोहळा पार पाडला. शिवाय वऱ्हातीला डिजेचा दणदणाट ही केला. त्यामुळं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य देवराम लांडे यांच्यावर जुन्नर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केलेत. शिवाय कार्यालय सील करण्याच्या दिशेने पावलं देखील टाकलीत. अध्यक्ष असताना लांडे हे राष्ट्रवादीत होते तर सध्या शिवसेनेत आहेत. 28 ऑगस्टला हा विवाह सोहळा पार पडला यासाठी हजारभर नावं असणारी पत्रिका त्यांनी छापली होती. जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके सुद्धा या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. मी दोनशे लोकांची परवानगी घेतली होती. पण मी लोकांच्या गळ्यातील ताईत असल्याने अन मी त्यांच्या लग्नाला जात असल्याने ते आले. मला नियम तोडायचे नव्हते. असं स्पष्टीकरण लांडे यांनी दिलं.