Nashik : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता धर्मयुद्धाला तयार राहा; मंदिरं खुली करण्यासाठी भाजप आक्रमक

Continues below advertisement

कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यानंतर  राज्यातील मंदिरं बऱ्याच काळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडावीत या मागणीसाठी आता भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून आज  राज्यभरात ठिकठिकाणी शंखनाद आंदोलन करत मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे.  पुण्यात कसबा गणपती मंदिरासमोर भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.  

चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेनेनाल दोन साथीदार असे मिळाले त्यांना देवावर विश्वास नाहीय.  अल्पसंख्याकांना खुश करण्यासाठी असं करावं लागतंय.  खुर्ची टिकवण्यासाठी आणि दोन्ही पक्षांना खुश करण्यासाठी सरकार मंदिरं खुली करत नाहीयत. लॉकडाऊनचे नियम सर्वांना सारखे पाहिजेत.  दारू घरी पोहचवतात.  सोबत असणाऱ्या दोन्ही पक्षांना खुश करण्यासाठी मंदिरं खुली केली जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram