Pune मध्ये अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, अपहरण करुन मुंबईत ठेवल्याची बाब उजेडात : ABP Majha

पुण्यात गुलटेकडी परिसरात एका १५ वर्षीय मुलीवर शेजाऱ्याने वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलीच्या वडिलांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी तिच्या शाळेत शिवजयंतीनिमित्त आयोजित नाटकात सहभागी झाली होती.  जेव्हा ती घरी परतली आणि कपडे बदलत होती, तेव्हा आरोपी तिच्या घरात घुसला आणि धमकावून तिच्यावर बलात्कार केला.
 त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार तिच्यावर बलात्कार केला.  जुलै महिन्यात आरोपी आणि त्याच्या मित्राने बळजबरीने तिचे अपहरण करून तिला मुंबईत ठेवले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola