7 महिन्यांनंतर लोणावळा अनलॉक, भुशी डॅमवर पर्यटकांची धमाल! बंदी उठल्याने गुलाबी थंडीचा आनंद
अनलॉकच्या पुढच्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील पर्यटन आजपासून खुलं झालंय. तब्बल सात महिन्यानंतर लोणावळा अखेर अनलॉक झालंय. त्यामुळे पहिल्याच दिवशी लोणावळ्यात पर्यटकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केलीय. पर्यटन बंदीमुळे पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड झाला. मात्र आता निर्बंध उठल्याने पर्यटकांना गुलाबी थंडीचा आनंद लुटता येणार आहे.