Pune : पुण्यात विसर्जनानंतर शाडूच्या मातीचं संकलन, शाडूची माती मूर्तिकारांसाठी मोफत उपलब्ध
जयदीप मेढे
Updated at:
16 Sep 2024 08:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune : पुण्यात विसर्जनानंतर शाडूच्या मातीचं संकलन, शाडूची माती मूर्तिकारांसाठी मोफत उपलब्ध
पुण्यात गणेशोत्सवात पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम केले जातात. पुण्यातही पुनरावर्तन संस्थेमार्फत विसर्जन केलेल्या शाडूच्या मातीचं संकलन केलं जातं.. ही माती पुन्हा मुर्तिकारांना मोफत उपलब्ध करुन दिली जाते.. अनेक पुणेकर घरगुती बाप्पाचं विसर्जन झालं की शाडूची माती या संस्थेला आणून देतात. विविध सोसायट्या आणि NGO मार्फत पुण्यात जवळपास १०० ठिकाणी ही संस्था काम करतेय