Pune : पुण्यात जमावबंदी; तरीही मंडीमध्ये खरेदीसाठी गर्दीच गर्दी
पुणे शहरात गणपतीच्या दिवसांत कलम 144 लागू करण्यात आलं असून दहा दिवसांची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. असं असलं तरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील महात्मा फुले मंडीमध्ये खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे.