Pune Ganesh Mandal | पुण्यात कोरोनाच्या संकटात मंडप न बांधण्याचा गणेश मंडळांचा कौतुकास्पद निर्णय
पुण्यातील प्रमुख गणपती मंडळांनी एकत्र येत यावर्षीचा गणपती उत्सव मंडप न टाकता साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्याच्या वेगवेगळ्या भागातील पन्नास पेक्षा अधिक गणपती मंडळं त्यासाठी एकत्र आली आहेत. या मंडळांकडून त्यांची मूर्ती वर्षभर जिथं ठेवली जाते त्या ठिकाणीच उत्सव साजरा करण्यात येणार आहे. पुण्यातील बाबू गेनू गणपती मंडळ, हत्ती गणपती मंडळं, राजाराम गणपती मंडळ यासारखी जुनी मंडळं या उपक्रमात सहभागी झाल्याने इतर मंडळं देखील या निर्णयाचं अनुसरण करतील अशी अपेक्षा आहे.