Hydrogen Ring | अंगठीच्या आकाराच्या वायुमेघचा शोध, दोन मराठी शास्त्रज्ञांचं संशोधन | ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील नॅशनल सेंटर फाॅर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्सच्या शास्त्रज्ञांनी खगोलशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. पृथ्वीपासून 26 कोटी प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या एका दीर्घिकेभोवती फिरणाऱ्या हायड्रोजन वायूचा दाट आवरण असल्याचं आढळून आलं आहे. हे हायड्रोजन वायूचं आवरण म्हणजे या गॅलेक्सीच्या भोवती जणू एक कडंच आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हायड्रोजनचं प्रमाण असूनही तिथे नवीन ताऱ्यांची निर्मिती होत नसल्याचं या संशोधनामधून समोर आलं आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या साहाय्याने हायड्रोजन वायूने वेढलेल्या या गॅलेक्सीचा शोध लावण्यात आला आहे. अशाप्रकारच्या आणखी 9 गॅलेक्सी या संशोधकांना सापडल्या आहेत.
Continues below advertisement