Pune मध्ये आई वडिलांच्या भांडणात मुलीला बंदुकीची गोळी लागल्याची धक्कादायक घटना : ABP Majha
आई वडिलांच्या भांडणात मुलीला बंदुकीची गोळी लागल्याची धक्कादायक घटना पुण्यातील नऱ्हे परिसरात घडलीय.या प्रकरणी पांडुरंग उभे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय... काल रात्री
पती-पत्नीचं भांडण झालं त्यानंतर रागाच्या भरात पतीने रिव्हॉल्व्हर पत्नीवर उगारली. आणि ती गोळी त्यांच्या मुलीच्या छातीला लागली..या गोळीबारीत मुलगी राजनंदिनी गंभीर जखमी झाली होती सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.. दरम्यान पांडुरंग उभे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.