'Mi Savarkar' event at Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात पुरोगामी विद्यार्थ्यांचा गोंधळ
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये चांगलाच गोंधळ झाला...मी सावरकर या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात हा गोंधळ झाला...फर्ग्युसन महाविद्यालयातील पुरोगामी विचाराच्या विद्यार्थ्यांनी याला तीव्र विरोध केला...त्यामुळं शरद पोंक्षे यांना मागच्या प्रवेशद्वारानं कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करावा लागला..यावेळी दोन्ही गटातील विद्यार्थी आमनेसामने आले..आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली..फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..महाविद्यालय प्रशासन नेहमीच पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप पुरोगामी विद्यार्थ्यांनी केला..आयोजकांनी मात्र यावर अधिक बोलण्यास नकार दिला