Pune Drug Case Update: तरूण बाथरूममध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हीडीओ,ड्रग्ज सापडलेल्या हॉटेलबाहेरून आढावा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Drug Case Update: तरूण बाथरूममध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हीडीओ,ड्रग्ज सापडलेल्या हॉटेलबाहेरून आढावा
जे शहर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं... त्या पुण्याची आता ड्रग्जचं माहेरघर अशी ओळख बनतेय की काय अशी भीती वाटू लागलीय...
कारण ललित पाटील, पोर्शे अपघात प्रकरणानंतर आता नवीन ड्रग्ज प्रकरण समोर आलंय..
पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरच्या लिक्विड लाऊंज हॉटेलमध्ये ड्रग्जचं सेवन होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय..
लिक्विड लाऊंज हॉटेलमधल्या पार्टीत काही तरुण ड्रग्जचं सेवन करताना आढळून आले आहेत.. तर अनेक अल्पवयीन मुलं दारुच्या नशेत असल्याचंही समोर आलंय.. मध्यरात्री ३ वाजल्यानंतरचे हे व्हिडीओ आहेत.. त्यामुळं पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळाही हॉटेलचालक पाळत नाहीत हे पुन्हा एकदा समोर आलंय..
दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरसह एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलंय.. हॉटेलच्या सीसीटीव्हीचीही पोलिसांनी तपासणी सुरु केलीय..