NCP vs BJP : पुण्यातील विकासकामाबाबतच्या निमंत्रण देण्यावरुन राजकारण

पुणे : पुणे महापालिकेच्या कारभारावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेच्या विविध प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (29 जून) मंत्रालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीला पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांना निमंत्रण दिलं असलं तरी महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रण दिलेलं नाही. महापालिकेत सत्ता राबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आयुक्तांचा वापर करत असल्याचा आरोप भाजप करत आहे. तर भाजपला कारभार करता येत नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.  

पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे, तब्बल 100 नगरसेवक भाजपचे आहेत. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महापालिकेत अजित पवार यांच्या मर्जीतील आयुक्त आले आहेत. त्यांच्यामार्फत राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपकडून केला जातो. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola