Pune Crime Special Report : संपत्तीसाठी सख्ख्या बहिणींनीच भावाचा काटा काढला
Pune Crime Special Report : संपत्तीसाठी सख्ख्या बहिणींनीच भावाचा काटा काढला
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक वनराज आंदेकरची (Vanraj Andekar Murder) त्याच्याच बहिणींच्या सांगण्यावरून निर्घृण हत्या करण्यात आली. भावा - बहिणीतील मालमत्तेचा आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे. आंदेकर कुटुंब गेल्या काही वर्षांत (Pune Crime News) राजकारणात सक्रिय झालं. मात्र पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात या कुटुंबाचा रंक्तरंजित इतिहास तब्ब्ल पाच दशकांचाय . त्यामुळं वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर पुण्यातील टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.
पुण्यातील नाना पेठेत निवांत उभ्या असलेल्या वनराज आंदेकरांची चार दुचाकींवरून आलेल्या मारेकऱ्यांनी अवघ्या दहा सेंकदात हत्या केली . जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनराज आंदेकरांची पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि कोयत्यांनी वार करून हत्या करण्यात आली . वाऱ्याच्या वेगाने आलेले हल्लेखोर तसेच पसार देखील झाले . पुण्यातील मध्यवर्ती भागात झालेल्या वनराज आंदेकरांच्या या हत्येला त्यांचा सख्ख्या बहिणींसोबतचा मालमत्तेचा वाद कारणीभूत ठरला . गेल्या काही महिन्यांपासून वनराज आंदेकर यांचं त्यांच्या दोन सख्ख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी आणि दोन सख्खे मेहुणे जयंत आणि गणेश लक्ष्मण कोमकर यांच्यासोबत बिनसलं होतं .