पुणे शहरातून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीला हीटरनं चटके दिले, तसंच तिच्या डोक्यात आणि हातापायावर खलबत्त्याने वार केले.. पुण्यातील कोंढवा भागात ३० एप्रिल रोजी हा प्रकार घडला. ४० वर्षांच्या नराधन पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत महिलेच्या हातात मुलीचा मोबाईल होता.. मुलीच्या फोनवरून कुणाशी बोलत आहेस, असं म्हणत पतीनं तिला ओढून बेडरूममध्ये नेलं, आणि हीटरनं चटके दिले.